संस्थेकडील कर्जबाकी रक्कम न भरता जमीन खरेदी, विक्री, जमीन हस्तांतरण केलेल्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत चेअरमन हणमंत भोसले यांनी घेतली सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकांची भेट
प्रतिनिधि : सोलापूर
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन हणमंत भोसले यांनी
जमिनीचा कोणताही भाग कोणत्याही सदस्यास कर्ज म्हणून घेतलेले रक्कम व त्या वरील व्याज
याची पूर्णपणे परतफेड न करता त्यांनी परस्पर जमीन इतरास खरेदी, विक्री, जमीन हस्तांतरित
केलेल्या असल्याच्या नोंदी रद्द करण्या बाबत
सोलापूर जिल्हा बँकेचे प्रशासक श्री शैलेश
कोतमिरे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ह्या वेळी सोलापूर जिल्हा बँकेचे
प्रशासक श्री शैलेश कोतमिरे यांनी तातडीने निर्णय घेत सीनियर बँक इन्स्पेक्टर यांना
अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन हणमंत भोसले यांनी
दिली.
ह्या वेळी चेअरमन हणमंत भोसले व जावेद इनामदार इत्यादि उपस्थित होते.