पंढरपूर सिंहगडच्या श्रीनिवास उंब्रजकर ची "लार्सन टुब्रो इन्फोटेक" कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील पंढरपूर येथील रहिवाशी असलेले कुमार श्रीनिवास मंगेश उंब्रजकर यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
"लार्सन टुब्रो इन्फोटेक" हि कंपनी १९९७ साली भारतात स्थापन झाली आहे. सध्या या कंपनीचे देशभरातील ३३ देशात कार्यालय आहेत. याशिवाय ४९५ वेगवेगळया कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन करत आहे. भारतामध्ये या कंपनीत ४६ हजार हून अधिक इंजिनिअर्स काम करीत आहेत. हि कंपनी सायबर सेक्युरीटी, रोबोटिक्स प्रोसेस अँटोमेशन, डेटा सायन्स, बीग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आदींसह अनेक क्षेत्रातील कंपन्यांना सेवा उपलब्ध करून देत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील श्रीनिवास मंगेश उंब्रजकर यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३.५४ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"लार्सन टुब्रो इन्फोटेक" या कंपनीत श्रीनिवास मंगेश उंब्रजकर यांची निवड झाल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. प्रसाद कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.