स्वेरीत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ संपन्न

स्वेरीत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ संपन्न

पंढरपूर- ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त राज्यभरात स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले गेले असून आज सकाळी स्वराज्य महोत्सव अंतर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ झाले. स्वेरीत आज वर्धापन दिन असल्याने पाहुण्यांची रेलचेल व लगभग सुरु होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिवरे बाजार (जि.अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यापुर्वीच गायनाची नियोजीत वेळ झाली आणि सर्व पाहुणे व स्वेरीचे शिक्षक वृंद आहे त्याच ठिकाणी उभे राहून  राष्ट्रगीताचे समूह गायन सुरु करण्यात आले. 
           भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम साजरा केला जात आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय कार्यालय यांच्या आदेशानुसार स्वेरीत देखील राष्ट्रगीताच्या समूह गायनाचे  आयोजन केले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकीच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ स्वेरीच्या वर्धापन दिन निमित्त आकर्षक रांगोळी काढली होती. आलेले पाहुणे रांगोळी मधील रंग संगती पहात असतानाच अकरा वाजले आणि समूह राष्ट्रगीताचे गायन झाले. यावेळी कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार (जि.अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पुण्यातील ब्रिगेडीअर बोधेज् करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे, सौ. सुनिता बोधे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, सर्व पदाधिकारी व विश्वस्त,
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे,गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजी आसबे,  सरपंच विलास मस्के, भारुडकार सौ. चंदाताई तिवाडी, आर्कीटेक्ट यादगिरी कोंडा, सरपंच संघटनेचे आदिनाथ देशमुख,  यांच्यासह प्रशासकीय, खाजगी, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर, निवृत्त अधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post