विभाजनामुळे भारताची हानी- प्रा. संदीप सावेकर
पंढरपूर रोटरी क्लब कडून "अखंड भारत" याविषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचा वारसा हा २४ देशांमध्ये असून सांस्कृतिक दृष्टीकोनातून ते भारताशी पूर्वापार जोडले गेले आहेत. भारतीय संस्कृती ही जगात थोर असून मागील काही वर्षामध्ये अनेक देशांचा समावेश यामध्ये होतो. भविष्यात भारत देश हा सर्वांच्या मदतीने प्रगती करेल व विश्र्वगुरू होण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारतापासून इंग्रजांच्या राजवटीत भारतापासून वेगळे पडले असुन विभाजनामुळे भारताची खुप मोठी हानी झाल्याचे मत प्रा. संदीप सावेकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे.
रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये "अखंड भारत" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान मार्गदर्शन करताना प्रा. संदीप सावेकर बोलताना पुढे म्हणाले, खंडित भारत ही एक वेदना असून इंग्रजांच्या भेद निती मुळेच जाती व धर्म व्यवस्थेमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम झाले व यामुळे आपल्या राजकीय फायदा व सत्तेसाठी इंग्रजांनी विषमतेचे बीज पसरवले आहे. यामुळे ते अनेक वर्ष राज्य करू शकले. स्वातंत्र्य दिवशी आपल्या थोर परंपरांच्या स्मृती जागवून देशाची एकता व अखंडता टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांची असल्याचे मत प्रा. संदीप सावेकर यांनी सागितले.
Tags
पंढरपूर घडामोडी