पंढरपूर सिंहगड काॅलेज व रोटरी क्लब यांच्या संयुक्त उपक्रमातून कचरामुक्त दिंडी अभियान
पंढरपूर: प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे १० जुलै रोजी आषाढी वारी निमित्त विविध ठिकाणांहून अनेक वारी मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दिंडी सोहळ्यात पायी चालत येत आहेत. या दिंडी सोहळ्यात पर्यावरण सरंक्षण व्हावे म्हणून रोटरी क्लब पंढरपूर व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकचळवळ नैसर्गिक द्रोण पञावळीची "प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान-२०२२"
बुधवार दिनांक ६ जुलै २०२२ रोजी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या माध्यमातून पंढरपूर सिंहगडच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे जाऊन लोकचळवळ नैसर्गिक द्रोण पञावळीची "प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान-२०२२" राबविण्यात आले. या अभियानात मध्ये रोटरी क्लब चे नुतन अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सिंहगडचे काॅलेज उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत देशमुख, रोटरी क्लब चे सदस्य आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून वारक-यांसोबत जाऊन चर्चा करून सामाजिक प्रदुषण बाबत जनजागृतीपर प्रबोधन करून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.