इंजिनिअरींगचे शिक्षण हे प्रवाही शिक्षण- प्रा. विनायक परिचारक
○पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा
पंढरपूर:
इंजिनिअरींग ही मुख्य शाखा असुन या शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अविष्कार ची खुप संधी आहे. स्वतःचे लाईफ जगत असताना आनंदात जीवन जगण्याचे इंजिनिअरीग शिक्षण आहे. कंपनीने तुम्हाला दिलेले काम कसे करतात यावर पॅकेज अवलंबून असते. यश मिळवायचे असेल तर मेहनत घेणे आवश्यक. कमी मार्क मिळाले की ते चॅलेंजिंग असते निराश न होता नंतर यशसाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण चालत आहे. माणुस कधी ही कुठल्याही टप्प्यांवर सुधारू शकतो. नकारात्मक गोष्टीचा विचार करू नका. नाॅलेज मिळवायचा प्रयत्न करा मार्क आपोआप मिळतील. ज्या विद्यार्थ्यांचे कौतुक झाले ते तर यशस्वी होतीलच पण त्याच बरोबर इतराना प्रेरणाही देतील.
खाजगी काॅलेज मध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत असल्याचे मत प्रा. विनायक परिचारक यांनी व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा शुक्रवार दिनांक १ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्रा. विनायक परिचारक, कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, पालक प्रतिनिधी नितीन म्हमाणे, प्रा. निहाल पटेल आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.
या मेळाव्यात सहभागी झालेले प्रा. विनायक परिचारक, प्रा. निहाल पटेल व पालक प्रतिनिधी नितीन म्हमाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन काॅलेजच्या वतीने स्वागत करण्यात आले. या पालक मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी काॅलेज, प्लेसमेंटबद्दल, शैक्षणिक पद्धतीचे कौतुक करून आनंद व्यक्त केला. यादरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रथम सञ परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, पेन व गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
या मेळाव्याचे सुञसंचलन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर आभार प्राचार्य डाॅ. संपत देशमुख यांनी मानले.