पंढरपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश करांडे यांची निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
रोटरी क्लब पंढरपूर अध्यक्ष पदाचा कार्यकाल हा ३० जुन रोजी संपणार आहेत. २०२२-२३ या कालावधीत रोटरी क्लब च्या नुतन अध्यक्ष व संचालकांच्या पदग्रहण समारंभ हा कार्यक्रम रविवार २६ जुन रोजी सिंहगड कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ पंढरपुरच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश जगन्नाथ करांडे यांची निवड झाली असून, त्यांच्या अध्यक्षपदाचा व नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पंढरपूर येथील सिंहगड काॅलेज येथे माजी प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, रो. विष्णू मोंढे व असिस्टंट गव्हर्नर रो. दिपक चोथे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ पंढरपूरच्या सचिवपदी रो. सचिन भिंगे, यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, येणाऱ्या वर्षात स्वच्छता अभियान, वैदकीय शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, सामाजिक उपक्रम आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील असे मत नुतन अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
यावेळी सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, प्रेसिडेंट रो. किशोर निकते, सेक्रेटरी रो. प्रशांत कुलकर्णी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.