पंढरपूर सिंहगडचे डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना विद्यापीठाकडून संशोधन निधी प्राप्त
पंढरपूर प्रतिनिधी: नागेश काळे
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्यरत असलेले डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून ८५ हजार रुपये संशोधन निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयाकडून मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये एस. के. एन. सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्राध्यापक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावाची विद्यापीठ स्तरावर व बाहेरील स्तरावरून निवड करण्यात आली आहे डाॅ. बाळासाहेब गंधारे यांच्या प्रस्तावास ८५ हजार रूपये संशोधन निधी मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयातील संशोधनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मेकॅनिकल क्षेञाशी निगडित असलेल्या "सोलर पॉवर प्लांटच्या देखभाल धोरणाचे मूल्यांकन" या विषयावर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास विद्यापीठाने मान्यता दिली असुन ८५ हजार रूपये अनुदान मिळणार आहे.
प्रत्येक वर्षी महाविद्यालयाला संशोधनासाठी निधी प्राप्त होत असल्याने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात जास्तीत-जास्त संशोधन निधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रयत्न करीत आहेत.
या संशोधन निधीचा फायदा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून निधी प्राप्त केल्याबद्दल संशोधनास यांचे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.