मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या शाही पोलीस स्टेशन हद्दीतील डंका येथील रहिवासी निर्देश उपाध्याय आपल्या 4 महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन गच्चीवर फिरत होते. यावेळी अचानक माकडांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर निर्देश यांनी आरडाओरड सुरू केली. काही माकडांनी निर्देश यांना घट्ट पकडून ठेवले.
अखेर आवाज ऐकून घरातील लोक मदतीसाठी गच्चीवर आले, पण तोपर्यंत माकडांनी निर्देशच्या हातून मुलाला हिसकावून घेतले होते. यावेळी माकडांनी कोणाला काही समजायच्या आत मुलाला छतावरून फेकून दिले. तीन मजल्यांच्या छतावरून खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, निर्देशचे कुटुंबीय गच्चीवर पोहोचले असता माकडांच्या कळपाने त्यांच्यावरही हल्ला केला.