विज बिल जास्त आल्याने मानसिक संतूलन बिघडल्याच्या एका घटनेने सोशल मीडियावर हाहाकार माजवलाय.
उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील हि घटना आहे. विजबिल जास्त आल्याने एका व्यक्तीचे टेन्शन वाढले आणि तो चक्क विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवरच चढला. या घटनेच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नंदा का पुरा या गावात राहणाऱ्या अशोक निषाद हा वाढीव विजेचं बिल आल्याने विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवर चढला. कुटूंबाकडून पोलिसांना माहिती मिळताच पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांला खाली उतरवले.
अशोक निषादची पत्नी मोना देवी यांनी सांगितले की वीज वितरण विभागाकडून विजेचं बील वाढवून आल्याने अशोक तणावात आला तब्बल 80,700 रुपये विजेचं बील आल्याने त्याचं मानसिक संतूलन खालावले. एवढंच काय तर वीज वितरण कंपनीकडून घरातील वीज कापण्यात आली असल्याचे त्याच्या पत्नीकडून सांगण्यात आले.