आत्महत्यांची धास्ती?
अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचेही प्रयत्न झाले आहेत. काही जण पाण्याच्या बाटलीतून रॉकेल किंवा कीटकनाशक अन्यथा एखादं रसायन घेऊनही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठीही पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
गुटखाबंदी, पण भिंती बरबटलेल्या…
दुसरीकडे मंत्रालयात गुटखाबंदी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भेटीगाठींसाठी येणाऱ्यांच्या बॅग आणि खिशांची तपासणी होते. पान तंबाखूच्या पुड्या गेटवर काढून घेतल्या जातात. पण तरिही अनेकजण छुप्या मार्गाने तंबाखूच्या पुड्या मंत्रालयात घेऊन जात असल्याचंही दिसून आलंय. मंत्रालयातील स्वच्छतागृहात गुटखा खाऊन थुंकल्यानं बेसिन तुंबल्याचे प्रक्रार समोर आलेले होते.
आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जनता मंत्रालयात येत असते. याआधीही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. मध्यंतरीही मंत्रालयात विष प्रशान करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होते. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आता खबरदारी घेतली जाते आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिण्याच्या पाण्याची पिंपं भरुन ठेवण्यात आली आहेत.