सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर बाबत यशवंत पवार यांची अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे तक्रार

सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर बाबत यशवंत पवार यांची अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे तक्रार
सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर वर जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा अंकुश नसून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यातील नवीन विडी घरकुल कामती कुरूल बोरामणी पंढरपूर तालुका माळशिरस तालुका बार्शी तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा तालुका त्याचबरोबर इतर ठिकाणी बोगस डॉक्टर बिनदिकीतपणे सोलापूर जिल्ह्यात रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टर मुळे सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांचे  आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन वेळीच कारवाई  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करायला हवी होती  परंतु  जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर  यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरबाबत  कोणतीही कारवाई न केल्याचे यशवंत पवार यांनी तक्रारीत नमूद करून सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून 
  ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी
*दिनांक 2/6/2022 रोजी मा जिल्हाधिकारी सोलापूर*
*दिनांक 10/6/2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर*
*दिनांक 11/7/2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर*
यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती परंतु अद्याप सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कोणतीच कारवाई न झाल्याने ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post