पंढरपुर सिंहगड मध्ये "नॅशनल टेक्नॉलॉजी डे" निमित्त व्याख्यान
पंढरपूर
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये सोमवार दिनांक २३ मे २०२२ रोजी इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी "नॅशनल टेक्नॉलॉजी डे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ. शेशाद्री मुरली सायंटिस्ट भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई आणि काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे 1998 रोजी पोखरण येथे अनु बॉम्ब चाचणी भारत देशाने जगभरात नावलौकिक मिळविले व अनुविज्ञान क्षेत्रात आपला एक अनोखा दबदबा तयार केला. या दिवशी नॅशनल टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करावा असे संबोधित केले.
हा दिवस साजरा करण्यासाठी एस के एन् सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे डाॅ. शेशाद्री मुरली सायंटिस्ट भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांनी सर्व विद्या्थ्यांना दोन तास रेडिएशन या विषयावर आधारित प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व माहिती दिली. तसेच या क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयासंदर्भात मार्गदर्शन केेले. डॉ. श्याम कुलकर्णी आणि
प्रा. सोमनाथ कोळी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.