*सिंहगड पंढरपूर मध्ये ग्रुप डिस्कशन कॉम्पिटीशन उत्साहात संपन्न*
पंढरपूर प्रतिनिधी:
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील स्थापत्य इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) यांच्या संयुक्त विद्यमाने व काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली
"जीडी (ग्रुप डिस्कशन) कॉम्पिटीशन" (समूह चर्चा स्पर्धा) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली अशी माहिती सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा सराव म्हणून आयोजित केली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन काॅलेजचे उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. अभिजित सवासे, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. यशवंत पवार, प्रा. अमोल कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाअंतर्गत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला तर 200 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कु. मुनीरा खान ही विजेती तर कु. मानसी नवले ही उपविजेती ठरली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. विनोद आसबे, कु. स्नेहल भाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. यशवंत पवार यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा. अभिजित सवासे सर यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विदयार्थी प्रतिनिधी म्हणून कु. अक्षय राजहंस व कु. सोमनाथ मिसाळ यांनी जबाबदारी पार पाडली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अमोल कांबळे यांनी दिली.