पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात "प्लास्टिक इंजिनिअरींग" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग गुरुवार दिनांक १९ मे रोजी प्रा एस. ए. जेऊरकर यांचे "प्लास्टिक इंजिनिअरींग" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. एस. ए. जेऊरकर म्हणाले, डिझाइन करत असताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत, त्याची प्रोसेस कशी असावी या विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. डिझाइन ऑफ प्लास्टिक, पार्ट फाॅर इंजेक्शन, मोब्लिग, कार्पोरेशन आणि टान्सपर मोल्डिंग या विषयावर मार्गदर्शन केले. हे व्याख्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डाॅ. श्याम कुलकरणी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. राहूल शिंदे, प्रा. धनंजय गिराम आदींनी परिश्रम घेतले.