प्रा. मारूती नवले व डाॅ. सुनंदा नवले यांना दै. सकाळचा महाब्रँड्स पुरस्कार प्रदान
माजी खा. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस , प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती
पंढरपूर: प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक सकाळ समुहाच्यावतीने पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये माजी खासदार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस व प्रतापराव पवार आदीच्या उपस्थित सिंहगड इन्स्टिट्युट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारूती नवले व डाॅ. सुनंदा नवले यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
दैनिक सकाळ समूहाच्या वतीने महाराष्ट्रात समाजासाठी नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अलौकिक व्यक्तीला महाब्रँड्स पुरस्कार देण्यात येत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सिंहगड संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. याच कार्याची दखल घेऊन दैनिक सकाळ समुहाने सिंहगड संस्थेतेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारूती नवले व सचिव डाॅ. सुनंदा नवले यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दैनिक सकाळ समुहाने शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारूती नवले व डाॅ. सुनंदा नवले यांना महाब्रँड्स पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंहगड संस्थेत आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले असुन या महाब्रँड्स पुरस्कारामुळे सिंहगड संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला गेला आहे. महाब्रँड्स पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. मारूती नवले व डाॅ. सुनंदा नवले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी: दैनिक. सकाळचा महाब्रँड्स पुरस्कार स्विकारताना प्रा. मारूती नवले व डाॅ. सुनंदा नवले यादरम्यान माजी खासदार शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस व प्रतापराव पवार आदी