दैनिक तुफान क्रांती च्या विभागीय उपसंपादक पदी यशवंत पवार यांची फेरनियुक्ती
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी न्याय हक्कासाठी त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व शासकीय जाहिराती त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून नेहमीच पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून राज्यातील पत्रकारांसाठी नेहमीच आंदोलने उपोषणे व निवेदने सादर करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच बरोबर वृत्तपत्रा माध्यमातून परखड लेखन सडेतोड मांडणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त वंचित पीडित शोषित घटकाला न्याय देण्याची भूमिका नेहमीच पार पाडत असल्याने यशवंत पवार यांची लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्र च्या विभागीय उपसंपादक पदी फेरनियुक्ती करण्यात आली असून पत्रकारांसाठी कायम संघर्ष करणारा म्हूणन आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशवंत पवार यांची लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी
विभागीय उपसंपादक पदी फेरनिवड केली असून राज्यातील पत्रकारां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकारांच्या प्रश्नावर शासन दरबारी नेहमीच लढाई करणाऱ्या यशवंत पवार यांच्या निवडीचे राज्यभरातील पत्रकारांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून यशवंत पवार यांचे राज्यभर कौतुक होत अजून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे