विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अभिजीत पाटील यांनी फुंकले रणशिंग
*ठळक मुद्दे*
-सभासदांनी विश्वास दाखविल्यास थकीत ऊस बील, कामगार पगार देऊनच पुढील गळीत हंगामाची मोळी टाकणार
-शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बील आणि कामगारांना पगार देणार
-कारखान्यातील एक रूपयाही घरी घेऊन जाणार नाही
-कारखान्याचा भत्ता, गाडी, डिझेलही वापरणार नाही.
(उबरगाव येथील सभासदांनी जाहीर पाठिंबा देत अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला)
प्रतिनिधी/-
तुंगत येथे काल दि.२१एप्रिल २०२२ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची गेल्या तीन चार वर्षात दयनीय अवस्था झाली आहे.
विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने केलेल्या गलथान कारभारांमुळे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची बिले कारखान्याकडे थकीत असून कामगारांचे पगारही अद्याप मिळालेले नाहीत. त्यातच विठ्ठलच्या निवडणूकीचे बिगुल सध्या वाजले असून वातावरण तापत असून विचार विनिमय बैठकीत हजारोच्या संख्येने उपस्थिती दाखवत सभासदांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शविदा आहे.
यावेळी तुंगत गटातील शेतकरी सभासदांच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार मंगेश रणदिवे, मा.सरपंच अमित सांळूखे, उपसरपंच पंकज लामकाने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णु भाऊ बागल,चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, दत्ता नाना नागणे, मोहन भाऊ तळेकर, मारुती भाऊ कोरके, तुंगतचे माजी सरपंच राजाभाऊ रणदिवे, माजी उपसरपंच विठ्ठल नाना रणदिवे, समाधान कदम, दत्तात्रय रणदिवे, अरूण आण्णा रणदिवे, प्रकाश रणदिवे सर, काशीद साहेब,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा. कायदेशीर सल्लागार श्री.विश्वंभर चव्हाण , ढेरे सर,राज्य प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष शेळके सर,सेवानिवृत्त पोलिस चंद्रकांत पवार ,सातारा सहकारी बँक ,संचालक अविनाश नालबिलवार,पवार सर,.अशोक जाधव सर, राजाराम आण्णा सावंत, दत्तात्रय व्यवहारे, दशरथ आबा जाधव, तुकाराम मस्के सर, समाधान गाजरे, महादेव तळेकर सर, नवनाथ रणदिवे सर, शिवाजी गायकवाड सर, किरण घोडके आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले उस्मानाबाद, नाशिक, नांदेड व सांगोला ४पडलेले परजिल्ह्यातील साखर कारखाने चालवून त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम केले आहे. परंतू मी ज्या कारखान्याचा फाऊंडेशन सभासद आहे तो कारखाना आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असणारा विठ्ठल कारखाना गेल्या दोन वर्षांपासून संचालक मंडळाचे चुकीचे धोरणामुळे बंद स्थितीत आहे. शेतकऱ्यांसह या ठिकाणच्या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांची होणारी हेडसांळ लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी सोपविल्यास कारखान्याची मोळी टाकण्याअगोदर सर्व शेतकऱ्यांची थकीत बिले, वाहतूकदारांची तोडणी बिले, कर्मचाऱ्यांचे पगार देऊनच मोळी टाकणार सांगितले.
आज बाहेरील देशात साखर विक्री करून लवकर शेतकऱ्यांना बील देण्याचे धोरण, इथेनॉल, सीएनजी, बायोगॅस, या उप पदार्थातून अधिक नफा घेत शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची भूमिका असेल. सांगोला कारखान्यांच्या मोळी पूजनावेळी शेतकर्यांनी ऊस कोठेही वजन करून आणण्याची ग्वाही दिली होती. तशीच ग्वाही आज विठ्ठलच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
गत दोन वर्षांपासून विठ्ठल बंद स्थितीत असल्याने पंढरपुरच्या बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला असून कारखान्याचे सभासदांना कर्मवीर औदुंबर अण्णा यांचे कार्यकाळात मान सन्मान प्रतिष्ठा होती ती आता राहिलेली नाही हाच मान सन्मान पुन्हा आणण्यासाठी सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवून जबाबदारी सोपवली तर मी कारखान्याची गाडीच काय डिझेल, भत्ताही घेणार नाही आणि एक रुपया घरी नेणार नाही अशी शपथच त्यांनी उपस्थित सभासदा समोर घेतली.
* विठ्ठल चा चेअरमन झाला की आमदारकीचे स्वप्न पडतात- डाॅ.रणदिवे
यावेळी बोलताना डॉक्टर योगेश रणदिवे म्हणाले अभिजीत पाटील साखर कारखानदारीतील डॉक्टर आहेत आगामी काळात विठ्ठल च्या माध्यमातून शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत गळीतास जाऊन बिले वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना बाकीचं काही देणंघेणं नाही बाहेर सभासदांमध्ये कुजबूज आहे पंढरपूर तालुक्याचा इतिहास आहे विठ्ठल चा चेअरमन झाला की आमदारकीची स्वप्ने पडतात आणि कारखान्याची वाट लागते हा इतिहास आहे या निमित्ताने मी विनंती करतो आपण आमदार खासदार मंत्री व्हा आमच्या शुभेच्छा आहेत परंतु सर्वांचे साक्षीने शब्द द्यावा की जोपर्यंत विठ्ठल कारखाना कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत आमदारकीचे स्वप्न पाहणार नाही आणि त्यातून ह उशीर होत असल्यास आम्ही आमचे नेत्याकडे आपल्या विधान परिषदेसाठी आग्रह करू असे रणदिवे यांनी सांगितले.
* विठ्ठल हॉस्पिटल जाण्याची भीती- डाॅ.लामकाने
विठ्ठल कारखान्याचे निवडणुकीमध्ये विठ्ठल कारखान्यावर सत्तांतर झाल्यास आपल्या ताब्यातील विठ्ठल हॉस्पिटल जाईल अशी भीती काही जणांना वाटत आहे. आणि तसे झाल्यास हॉस्पिटलच्या माध्यमातून पाटील हे विठ्ठलच्या सभासदांसाठी मोफत उपचार सुरु केल्याशिवाय राहणार नाहीत सत्ताधारी मंडळींना कारखान्याच्या निवडणुकीचे काही नाही परंतु विठ्ठल हॉस्पिटल हातातून जाईल याची भीती वाटत असल्याचे मत डॉक्टर पंकज लामकाने यांनी बैठकीत व्यक्त केले.
* २५वर्षात मी विठ्ठलचा संचालक असताना अशी दैनी अवस्था कधीच बघितली नाही -ॲड.चव्हाण
विठ्ठल कारखान्यावर झालेला भष्ट्राचार हा पाहवत नाही आणि कोट्यावधी कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कार्मचारी, वाहतूक ठेकेदारांची बील दोन-तीन वर्ष मिळत नाहीत. हि दैनी अवस्था पाहून वेदन होतात. यामुळे औदुंबर आण्णाच्या काळातील कारखाना बघायचा असेल तर सभासदांनी प्रामाणिकपणे अभिजीत पाटलांच्या मागे खंबीर उभा रहावे. नक्कीच आण्णांच्या काळातील दिवस पुढे आणू असे ॲड.विश्वभंर चव्हाण म्हणाले.
* आम्ही देखील पूर्ण ताकदीने अभिजीत पाटील यांच्या सोबत आहोत:- सेवानिवृत DYSP चंद्रकांत पवार
स्वच्छ आणि प्रामाणिक कारभार करणारे आणि अल्प कालावधीत सहकारातील जादूगार असणारे अभिजीत पाटील हेच औदुंबर आण्णांच्या विचारासारखा कारखाना चालवतील आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत.