विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू करा माऊली हळणवर यांची मागणी
भाजपा आरपीआयच्या वतीने उपसभापती नीलमताई गोर्हे यांना निवेदन
पंढरपूर. प्रतिनिधी
आज पंढरपूर येथे विधान परिषदेच्या उपाध्यक्षा मा.नीलमताई गोर्हे आल्या असता यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शिर्डी संस्थांनच्या धर्तीवर पंढरपूर मध्ये गोरगरीब भाविकांसाठी सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू करावे अस्या सूचना मंदिर समितीला आपण द्याव्यात व पंढरपूर शहरांमध्ये वर्षातील चार वाऱ्या व दररोज भाविक लाखोंच्या प्रचंड संख्येने येत असतात हे भाविक शेतकरी गोरगरीब कष्टकरी समाजातील असतात पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हे स्थानिक व ग्रामीण भागातील पंढरपूर करांसाठी तोडके पडत असून शिर्डी संस्थानच्या धरतीवर पंढरपूर मंदिर समितीच्या वतीने अशाप्रकारच्या एक मोठं हॉस्पिटल उभा करून गोरगरिबांची सेवा करावी
असे भाजपा व रिपब्लिकन पार्टी च्यावतीने मागणीचे निवेदन दिले यावेळी आरपीआयचे नेते दीपक आबा चंदनशिवे ,भाजपा किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर ,समाधान बाबर ,राजकुमार भोपळे ,दादा कोळेकर ,गणेश मेटकरी ,आण्णा उसके ,हनुमंत शेंडगे आदी उपस्थित होते