पत्रकारांच्या आधारवढ
सुवर्णा सुना यांचा सोलापूरात सत्कार
सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या महिला विभाग जिल्हाध्यक्षा सौ सुवर्णा सुना सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आले असता पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते सुवर्णा सुना यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड नाही
*राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने उपोषणे निवेदने सुरु असून जोपर्यंत राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही सत्काराला उत्तर देताना सुवर्णाताई सुना म्हणाल्या त्याच बरोबर पत्रकार महिलांच्या प्रश्नाबाबत आपण गंभीर असून राज्यातील महिलांचे प्रश्न शासन दरबारात मांडून त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू असं ठोस आश्वासन पत्रकार सुरक्षा समिती महिला विभाग जिल्हाध्यक्ष सुवर्णताई सोना यांनी सत्कार प्रसंगी दिल आहे*
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बळीराम पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा संघटक दत्तात्रय पवार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा संपर्कप्रमुख कादर शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा शहर उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार राजेंद्र शहा प्रसाद ठक्का अशोक ढोणे इम्तियाज अक्कलकोटकर रोहित घोडके मोहम्मद इंडिकर विष्णू सकट विशाल मोरे भागप्पा प्रसन्न सत्तार डोंगरी इत्यादी उपस्थित होते