पंढरपूर प्रतिनिधी
श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात १३ लाख ७५ हजार ५५५ व्या साखरेच्या पोत्याचे पूजन चेअरमन,आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात नंबर वन चालत असून साखर उत्पादन अग्रेसर असणारा हा साखर कारखाना कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांनी हा कारखाना उभा करून जिल्ह्यात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यां ना आता ह्याचा फायदा होत आहे आज जिल्ह्याचे आमदार चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पोळी भूमिपूजन करण्यात आले हा दिमाखदार सोहळा पांडुरंग कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी माजी आमदार कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांनी सुरु केलेला हा कारखाना प्रगतीपथावर नेण्याचे काम प्रशांत परिचारक करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत तालुक्यातील जादा असलेला ऊस गाळप करणे हे मोठे आव्हानच होते .परंतु प्रशांत परिचारक यांनी योग्य नियोजन करून सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आज त्यांनी केले आहे हे शेतकरी कधीही विसरू शकणार नाहीत.यावेळी श्री पांडुरंग परिवार तसेच जिल्ह्यातील साखर उत्पादक शेतकरी उपस्थित होते.