पंढरपुरात दोन दिवशीय तबला वादन कार्यशाळा
कलापिनी संगीत विद्यालय यांचे आयोजन
संपूर्ण जगभरात ज्या वाद्याने अधिराज्य गाजवले,गाजवत आहे व गाजवत राहिल ते म्हणजे तबला.
या तबला वाद्य संदर्भात प्राथमिक अवस्था ते व्यावसायीक अवस्था या विषयी विशेष मार्गदर्शनावर तबला वादन कार्यशाळा पंढरपूर येथे अयोजित केली आहे.
1978 पासून भारतीय संगीत शिक्षणाचा प्रचार,प्रसार व विकास यासाठी भारतासह विविध देशातील विद्यार्थ्यांना निरंतर मार्गदर्शन व शिक्षण देणारी संस्था म्हणजे श्री.कलापिनी संगीत विद्यालय.याच संस्थेच्या वतीने हि कार्यशाळा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अयोजित करण्यात आली आहे.
30 एप्रिल व 1 मे या दरम्यान हि कार्यशाळा असणार आहे.यासाठी मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून पं.विश्वासजी जाधव,मुंबई
(रजिस्ट्रार-अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पंढरपूर सह पंचक्रोशीतील सर्व तबला प्रेमींनी या संधीचा फायदा करुण घ्यावा या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे अवाहन विकास पाटील यांनी केले आहे.
संपर्क विकास पाटील सर
7875776067