*पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश*
पंढरपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मध्ये पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या माजी
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कुमारी भाग्यश्री धोण उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-अ), मृद व जलसंधारण विभाग, मदन मोहन अवताडे हे सहाय्यक अभियंता (स्थापत्य), वर्ग-२, सार्वजनिक बांधकाम विभाग, अजित नागनाथ सावंत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) वर्ग-२, जलसंपदा विभाग, नवनाथ विठ्ठल शिंदे सहाय्यक अभियंता (स्थापत्य), वर्ग-२, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिन सुरेश मस्के सहाय्यक अभियंता (स्थापत्य) वर्ग-२, जलसंपदा विभाग, पवन भगवान पाटील सहाय्यक अभियंता (स्थापत्य), वर्ग-२, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाधान बबन जगदाळे जलसंधारण अधिकारी (वर्ग-ब), मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन आदी पदांवर पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षा दिल्या या परिक्षेत पंढरपूर सिंहगडचे उपरोक्त ७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यशस्वी झाले आहेत.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असते. याचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. समीर कटेकर, प्रा. नामदेव सावंत, प्रा.अनिल निकम, प्रा. विनोद मोरे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.