एक आगळा वेगळा सत्कार
ऊस तोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे न मागितल्या बद्दल प्रामाणिक ऊसतोड मजुरांचा केला सत्कार
प्रतिनिधी
ईश्वर वठार
आज ईश्वर वठार येथे पांडुरंग परिवाराच्या वतीने ऊसतोड मजुरांचा सत्कार केला संपूर्ण राज्यामध्ये उसाचा प्रश्न गंभीर आहे ऊस तोड करण्यासाठी मुजरा कडून शेतकऱ्यांना आगाऊ पैशाची मागणी केली जाते परंतु ईश्वर वठार गावामध्ये पांडुरंग कारखान्याच्या चार टोळ्या चालु होत्या शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता आगाऊ पैशाची मागणी न करता शेतकऱ्यांनी स्वखुशीने मदत केली त्याच्यावरच समाधान मानत ईश्वर वठार गावातील संपूर्ण ऊस तोड करून गाव निल केले आहे त्याबद्दल आज सर्व ऊसतोड मजूर, वाहन मालक , यांचा सत्कार केला
तसेच कारखान्याचे चिटबाय डुबल साहेब, वरशल नागणे साहेब , यांनी ही वेळोवेळी लक्ष देऊन संपूर्ण ऊस तोड कसा होईल याचे नियोजन केले म्हणून त्यांचाही सत्कार केला यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने पांडुरंग कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी गाळप करीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याचं काम केलेल आहे गेल्या चार पाच वर्षापासून आमच्या गावा मधील ऊस काही गटबाजीच्या राजकारणामुळे कारखान्याला नेला जात नव्हता परंतु बहुजन हृदय सम्राट आमदार परिचारक साहेबांनी विशेष लक्ष देऊन आमच्या गावातील सर्व सभासदांचा ऊस वेळेवर तोड देऊन सहकार्य केले त्यामुळेच आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला यावेळी संचालक लक्ष्मणराव धनवडे, माऊली भाऊ हळणवर,माजी सरपंच नारायण देशमुख, मेजर हनुमंत राव देशमुख ,ज्ञानेश्वर गुंडगे ,पंकज देवकते ,भारत पांढरे ,दत्ता खांडेकर,बिरु खांडेकर,माळाप्पा खांडेकर ,बंडू लवटे, नारायण लवटे, शंकर पांढरे महावीर देवकते, यशवंत बंडगर, रामचंद्र मेटकरी ,रवींद्र गुंडगे , आदीसह पांडुरंग कारखान्याचे सभासद उपस्थित होते..