*सिंहगड मध्ये "मोबाईल अँपलीकेशन डेव्हलपमेंट" याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "मोबाईल अँपलीकेशन डेव्हलपमेंट" (अँन्डाँएड) याविषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. आनंद चोरदिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करणारे प्रा. आनंद चोरदिया यांचे महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. आनंद चोरदिया म्हणाले, मोबाईल ॲप कसे बनवतात हे आपण माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले. याशिवाय मोबाईल मधील अनके ॲप ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हि कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. मनोज कोळी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.