स्वेरीच्या तब्बल १६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत यश
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा विद्यार्थ्यांना झाला फायदा
पंढरपूर– महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील १६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएससी (अभियांत्रिकी सेवा) या परीक्षेत अदभूत यश मिळवले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची विविध विभागात विविध पदावर, विविध श्रेणीत निवड झाली आहे. एकूणच स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून स्पर्धा परीक्षेत हे यश मिळविले आहे. जिद्द, अफाट परिश्रम घेण्याची तयारी आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे हे विद्यार्थी सांगतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी १९९८ साली गोपाळपूर मध्ये स्वेरी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेंव्हापासून शिक्षणात अनेक नवनवीन व विधायक उपक्रम राबवत स्वेरीने यशाचा आलेख चढता ठेवला आहे. त्याचेच फळ म्हणून कि काय प्रशासकीय सेवेत स्वेरीचे विद्यार्थी यशस्वी होताना दिसत आहेत. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागामधून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी अथक परिश्रम घेवून प्रशासकीय सेवेत यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा मृदा व जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग अशा सिव्हील इंजिनिअरिंग विभागाशी संबंधित विविध विभागात उपविभागीय अधिकारी, सहाय्यक अभियंता, अशा विविध श्रेणीत स्वेरीचे हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. आकाश शिवाजी चव्हाण, स्वप्नाली अज्ञान गायकवाड, विशाल रत्नाकर सातपुते, राहुल नारायण बागल, लक्ष्मण नेताजी कवठे, अक्षय अशोक चौधरी, अनिल अरुण पुरी, वीरकुमार रामचंद्र शिंदे-पाटील, काजल मसू सरवदे, भक्ती लक्ष्मण सुळे, श्रद्धा राम मोहिते, युवराज महिपती तामखडे, महेश मारुती क्षीरसागर, मिनाक्षी महादेव रोंगे, सोहेल साजिद करमाळकर, दत्तात्रय मारुती गायकवाड या १६ व इतर काही विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. स्वेरीतून नियमितचे वर्ग, रात्र-अभ्यासिकेच्या माध्यमातून जादा अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी स्वेरीच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असणारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके या सर्व कारणामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा कल वाढला असून अचूक मार्गदर्शन, योग्य पुस्तके आणि परिश्रम करण्याची मानसिकता या भांडवलावर स्वेरीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत.
सिव्हील इंजिनिअरिंग मधील जवळपास ५० हून अधिक माजी विद्यार्थी राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि विविध हुद्द्यांवर कार्यरत आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे. स्वेरीच्या संतोष माळी यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यु.पी.एस.सी मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ६१२ वा क्रमांक मिळवला होता. सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक परीक्षेत एकाच वेळी स्वेरीचे १६ विद्यार्थी यशस्वी झाले होते. एकूणच वार्षिक परीक्षेचा निकाल, स्वेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षवेधी आहे आणि त्यातच आता स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली असून ही बाब विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे लक्षण तर पालकांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, इतर विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.