स्व. सुधाकरपंत परिचारक परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल .
ईश्वर वठार विकास कार्यकारी सोसायटी निवडणूक.
पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागली असून यामध्ये स्व. सुधाकरपंत परिचारक परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी प्रा सुखदेव धुपे सर,नारायणभाऊ देशमुख, माऊलीभाऊ हळणवर, बाळासाहेब खांडेकर, विजयआण्णा मेटकरी,माऊली गुंडगे, भारत पांढरे, रायाप्पा हळणवर, लक्ष्मण पाटील, हरिभाऊ देवकते, महाळाप्पा खांडेकर, रविंद्र गुंडगे,माऊली धुपे,
यावेळी बोलताना पॅनल प्रमुख माऊली हळणवर म्हणाले की स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने आणि जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत. अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना तसेच बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून मिळणार होते परंतु गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. याचा जाब सभासदांना निवडणूकीत द्यावा लागेल. काही लोक परिचारक
घराण्याच्या निष्ठे विषयी बोलत आहेत.
हे कोणाला सांगताहेत? अनेक मोठमोठी पदे परिचारक यांच्या आशीर्वादाने भोगली आहेत. तरीसुद्धा त्यांच्याशी गद्दारी करून पंचायत समितीला पराभव करून घेतला होता. गेली दहा वर्षांपासून सदरची संस्था बंद होती. याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी सभासदांच्या आग्रहास्तव स्व सुधाकरपंत परिचारक परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे.यामध्ये सर्वच सभासद शेतकरी आमच्या पाठीशी असल्याचे पॅनल प्रमुख हळणवर यांनी सांगितले.