सिंहगड मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी: नागेश काळे
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी सुनील बाबर, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुमित इंगोले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सांवत प्रास्ताविक करताना म्हणाले, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील ४९ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकऱ्या मिळाल्या आहेत. महाविद्यालयातील जवळपास २० विद्यार्थ्यांनी बाहेरच्या देशाला भेटी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात येत असतात. यामधुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते. कोरोना कालावधीत ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षी हॅकॅथाँन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये ११० विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी विविध विषयांवर वेबिनार आयोजित करण्यात येतात. महाविद्यालय विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड व्हावी यासाठी ट्रेनिंग देत असते. आज पर्यंत जवळपास १३० कंपन्यांनी महाविद्यालयाला भेट दिली आहे. पालकांकडून काही सुचना असतील तर सांगण्याचे आवाहन यादरम्यान प्रा. नामदेव सावंत यांनी केले.
या मेळाव्यात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वर्षभर अगोदरच नियोजन करत असते. विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास केल्यास नामांकित कंपनीत प्लेसमेंट होणे सहज शक्य आहे. करिअर दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.
पालक प्रतिनिधी सुनील बाबर बोलताना म्हणाले, सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. एखादा जर लेक्चर ला विद्यार्थी गैरहजर राहिला तर पालकांना फोन केला जातो. महाविद्यालयातील शिक्षक वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देत असल्याने या महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वञ निवडले जात आहेत. असे मत पालक बाबर यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात यशस्वी व प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब फुल, पेन, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुमित इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सार्थक व्होरा यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.