*पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी बळीराम पवार यांची निवड*
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार होते या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची नोंदणी पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता इत्यादी विषयावर चर्चा होऊन राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी बळीराम पवार यांची निवड करण्यात आली बळीराम पवार यांचा ओळख पत्र पुष्पगुछ शाल व नियुक्ती पत्र देऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
*पत्रकारांवरील होणारे हल्ले चिंतनीय बाब असून वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले करत असून बातमी लावण्यावरून जर जीवघेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही अशा माफियांना जशास तसे उत्तर देऊ असे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी बैठकीत म्हणाले*
या बैठकीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख महिला विभाग अध्यक्ष सुवर्णा सुना सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार शहर अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा डॉ राजेंद्र शहा शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद प्रसाद ठक्का अशोक ढोणे मोहम्मद इंडिकर इम्तियाज अक्कलकोटकर रोहित घोडके विष्णू सकट विशाल मोरे सत्तार डोंगरी भागप्पा प्रसन्न युनूस अत्तार इत्यादी पत्रकार उपस्थित होते