*राज्यस्तरीय युवा पत्रकार प्रमोद बनसोडे यांना जाहीर*
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
पंढरपूर प्रतिनिधी
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान १३१ वी जयंती महाउत्सव समितीच्यावतीने यावर्षीचा राज्यस्तरीय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर "युवा पत्रकार" पुरस्कार (प्रिंट मिडीया) साठी लक्ष्मी दहिवडी (ता. मंगवेढा) येथील दैनिक पुढारीचे पत्रकार प्रमोद बनसोडे यांना जाहीर नुकताच जाहीर करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
प्रमोद बनसोडे यांना मंगळवेढा तालुका पत्रकार संघ यांच्याकडून आदर्श पञकार, अखिल भारतीय समता परिषद शाखा फुलचिंचोली यांचेकडून समता गौरव उत्कृष्ट पञकार पुरस्कार, प्रतिभा-संग्राम गौरव ॲवार्ड-२०१८ तसेच पञकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सांगोला महात्मा फुले जयंती उत्सव समितीकडून ११ एप्रिल २०२२ रोजी गौरव आदी पुरस्कारांनी प्रमोद बनसोडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
याशिवाय या कार्यक्रमामध्ये पञकार प्रशांत आराध्ये, राजाभाऊ शहापुरकर, सचिन झाडे , सुरज सरवदे , प्रवीण नागणे , माऊली डांगे, संतोष रणदिवे या सर्व जेष्ठ आणि युवक पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रातील विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४० मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहर व तालुक्याचे नावलौकिक केल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सन्मान, पत्रकार संघांचे नुतन अध्यक्ष, कोरोना महामारीमध्ये मदतकार्य केल्याबद्दल शहर व तालुक्यातील ४० कोरोना योद्धयांना पुरस्कार, पंढरपूर नगरपालिकेच्या ४०आशा वर्कर महिला यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करून साडी वाटप करण्यात येणार आहे. "निळे वादळ' भीमगीतांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी केले आहे.