स्वेरीज् सोबस सेंटरचे पापरी येथे चर्चासत्र संपन्न

0
स्वेरीज् सोबस सेंटरचे पापरी येथे चर्चासत्र संपन्न

गृह उद्योग करण्यासाठी महिलांना मिळाली उर्जा 

पंढरपूर- स्वेरीज् सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स, पंढरपूर यांच्या विद्यमाने पापरी (ता.मोहोळ) येथे महिला बचत गटासोबत चर्चासत्र संपन्न झाले.
      ‘समाजाच्या हितासाठी नेहमीच एक पाऊल पुढे’ या संकल्पनेच्या जोरावर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या पुढाकारातून स्वेरीमध्ये ‘स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स' ची स्थापना करण्यात आली. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता विकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून ग्रामीण भागातील नवउद्योजकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करणे इ. कार्ये या सेंटरच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पापरी मध्ये महिलांसाठी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्राला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या चर्चासत्रात ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण कसे केले जाऊ शकते?’ या विषयावर विचारमंथन करण्यात आले. याप्रसंगी पापरी मधील सौ. संगीता सावंत, प्रतिभा जाडकर, शोभा भोसले तसेच काही होतकरू महिला प्रतिनिधींनी पुढे येवून गृह उद्योग करत असताना बाजारपेठ संदर्भातील भेडसावत असणाऱ्या समस्या आणि आर्थिक भांडवल, जागा, मनुष्यबळ, वाहतूक नियोजन आदी अडचणी मांडल्या. ‘सोबस इन्साईटस् फोरम’चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांनी महिलांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, यावर बहुमोल माहिती दिली. संचालक चौधरी यांच्या मातोश्री सौ. शारदाताई चौधरी यांनीही महिलांशी संवाद साधत ‘यशस्वी महिला उद्योजिकांचे अनेक दाखले देत यशस्वी उद्योग कसे उभा करावेत आणि आपल्या उत्पादनांचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष उद्योग करताना होणारा फायदा’ याची माहिती दिली. पापरी स्थित असलेले स्वेरीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रा.अनिल टेकळे यांनी ‘महिलांचे सशक्तीकरण व आर्थिक सक्षमीकरण करायचे असल्यास त्यांचे कौशल्य जाणून त्यांना एकत्रित आणणे महत्त्वाचे आहे.’ असे सांगितले. यावेळी सोबस मधील अधिकाऱ्यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना गृह उद्योग करण्यासाठी चालना मिळाली. यावेळी सोबसच्या संचालिका रिषा पटेल, सोबसचे व्यवस्थापक गिरीष संपत, उद्योजक विकास अधिकारी ईशान पंत, अभिजित चौधरी आणि  पापरीचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !