*पंढरपूर सिंहगडचे प्रा. समीर कटेकर यांना पीएच डी प्राप्त*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले प्रा. समीर कटेकर यांना नाशिक येथील संदिप विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरींग विषयात पी. एच. डी. पदवी जाहीर झाली आहे.
"डिटरमिनेशन ऑफ कुलोंब व्हिस्कस अँड पार्टिकल डँम्पिंग पॅरॅमिटर्स फाॅर हार्मोनिकली फोर्सड् लिनिअर ऑक्सीलेटर" हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. नाशिक येथील डॉ. चेतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा शोधप्रबंध पूर्ण करून नाशिक येथील संदिप विद्यापीठाकडे सादर केला होता.
डॉ. समीर कटेकर यांनी पीएच डी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. विनोद मोरे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.