*अभिजीत पाटील हे साखर उद्योगातील जादूगार:- साखर आयुक्त शेखर गायकवाड*

0
*अभिजीत पाटील हे साखर उद्योगातील जादूगार:- साखर आयुक्त शेखर गायकवाड*

(सांगोला साखर कारखान्याचे ३लाख १हजार १११ पोती पूजन साखर आयुक्तांच्या शुभहस्ते संपन्न)

प्रतिनिधी/-
महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त श्री.शेखरजी गायकवाड यांच्या हस्ते धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला साखर कारखान्याचे ३लाख १हजार १११ साखर पोती पूजन दि.०६ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले. 
'शेतकरी समृद्ध झाला पाहिजे', त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली पाहिजे, हा विचार समोर ठेवून कारखाने सुरू केले आहेत. १२वर्ष बंद असलेला कारखाना अवघ्या ३५दिवसांत सुरू झाल्याने कारखान्यामूळे झालेला कायापालट आपण अनुभवला आणि पाहिला देखील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे दर मिळावा म्हणून इथेनॉल कडे वळण्याचे सांगितले. शेतकऱ्यांना आणि कामगारांना केंद्रबिंदू मानून यशस्वी साखर कारखान्याची घौडदौड सुरू असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी शेखर गायकवाड म्हणाले, १२वर्ष  बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यास पंधरा दिवसात सरू केला ही आणि पंधरा दिवसात ऊस बील देऊ पण केले हि अभिमानाची गोष्ट आहे. कारखानदारीत अभिजीत पाटील सारखे चांगले लोक पुढे येणे गरजेचे आहे. अभिजीत पाटील हे साखर उद्योगातील खरोखरच जादूगार आहेत म्हणून उल्लेख देखील केला. यशस्वी गळीताची सांगोला साखर कारखान्याची साखर दुबईला खाण्यास मिळणार आहे असेही सांगितले. ऊस तोडणी मजुरांना देखील पेन्शन, आणि अपघात विमा मिळेल, महिलांना आरोग्यासाठी विशेष  तरतूद करण्यात आली असल्याचे श्री.गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सोलापूर जि.प. मा.अध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड, अवसहायक श्री.विष्णू डोके, श्री.पांडूरंग शिंदे मा.सभापती श्री. विष्णूभाऊ बागल, व्हा.चेअरमन श्री.विश्वनाथ चव्हाण, संचालक श्री.शहाजी नलवडे, श्री.तुकाराम  जाधव यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर साहेब पाटील, संचालक श्री.भागवत चौगुले, श्री.संतोष कांबळे, श्री.रणजीत भोसले, श्री.सुरेश सावंत, श्री.संदीप खारे, श्री.आबासाहेब खारे, श्री.संजय खरात, श्री.दिपक आदमिले, श्री.विकास काळे यासोबत पंचक्रोशीतील पदाधिकारी, तरूण सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !