एमएचटी-सीईटी २०२२ चे परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ

0
एमएचटी-सीईटी २०२२ चे परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ

स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध!
पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्र  व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या 'एमएचटी- सीईटी-२०२२’ या प्रवेश परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे' असे स्टेट सीईटी सेल, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरुन कळविले आहे.
    
          शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या त्या कोर्सची 'सीईटी २०२२' ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार  एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेसाठी  ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. गुरुवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ पासून ते शुक्रवार, दि. १५ एप्रिल, २०२२ (रात्री-११.५९) पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर शनिवार, दि.१६ एप्रिल पासून ते शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ (रात्री-११.५९) पर्यंत रुपये ५०० एवढ्या विलंब शुल्कासह या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आलेली असून आधीच्या मुदतीत सदर अर्ज न भरलेल्या विद्यार्थी आणि पालक यांनी या मुदतवाढीची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्यात घाई गडबड आणि अपुऱ्या माहितीमुळे बऱ्याचदा चूका होत असतात. त्या दृष्टीने स्वेरी अभियांत्रिकीच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये एमएचटी-सीईटी २०२२ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र / आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे  शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे. या ‘एमएचटी-सीईटी २०२२’ च्या ऑनलाईन नोदणीसंबंधी अधिक माहितीसाठी मोबा. नंबर– ९१६८६५५३६५,९८६०१६०४३१ व ९५४५५५३८७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले आहे तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाच्या www.mahacet.org  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !