पंढरपूर "सिंहगड व कॅस्पर" मध्ये सामंजस्य करार
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व "कॅस्पर" यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"कॅस्पर" क्षेञांमध्ये काम करण्यास प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संधी निर्माण करण्याच्या हेतुने हा सामंजस्य करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील सह-संस्थात्मक देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांच्या शोधात मदत करता यावी, संशोधकांना भविष्यातील सहयोगी ओळखण्यात मदत व्हावी आणि विद्यार्थ्यांचे व्यापक अभियांत्रिकी आणि वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन व्हावा हाच या कराराचा मुख्य हेतु असल्याचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रातील प्राध्यापक उपलब्ध होऊन त्यांचे कार्य आणि कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, इतर संशोधन गटांमध्ये नवीन तंत्रे आणि दृष्टिकोन शिकण्यासाठी, त्यांच्या निवडीच्या इतर सहभागी संस्थांना भेट देऊन त्यांना संशोधन निधी प्रदान करणे तसेच सहयोगी चर्चा, नवकल्पना, त्यांचा संशोधन दृष्टीकोन आणि करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात हा हेतु या सामंजस्य कराराचा आहे.
"कॅस्पर" करारा दरम्यान काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, जयंत आधंळगावकर, योगिनी कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत आदीजण उपस्थित होते.