स्वेरी फार्मसीच्या प्रा.प्राजक्ता खुळे यांना पीएच.डी. प्राप्त

0
                                                                                                                                               
स्वेरी फार्मसीच्या प्रा.प्राजक्ता खुळे यांना पीएच.डी. प्राप्त

पंढरपूर- येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा.प्राजक्ता कैलास खुळे यांना नुकतीच जयपूर (राजस्थान) मधील सुरेश ज्ञान विहार या विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ‘डेव्हलपमेंट अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ अॅन्टी फंगल जेल’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध जयपूर विद्यापीठास सादर केला होता.


      डॉ. रितु एम.गिलहोत्रा व डॉ. मनोज नितळीकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या सहकार्याने प्रा. प्राजक्ता खुळे यांनी फार्मसीमधील पीएच.डी. पूर्ण केली असून त्यांना महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांचे ही सहकार्य लाभले. डॉ.खुळे यांनी पीएच.डी. च्या संशोधनात वेगवेगळ्या पद्धतीचे जेल फॉर्म्युलेशन व निर्मिती करून त्यांची क्षमता तपासली. डॉ. खुळे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आजपर्यंत एकूण दहा संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत तसेच चार पेटंटस ही प्रसिद्ध केले आहेत. या संशोधना दरम्यान त्यांनी  पंढरपूर, पुणे येथील  राष्ट्रीय परिषदांमध्ये तर सिंगापूर व जयपुर येथील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर पेपर्सचे सादरीकरण केले आहे.पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. खुळे यांचा सत्कार करण्यात आला. ‘डॉ.खुळे हया स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात गेल्या १० वर्षापासून उत्कृष्ठपणे ज्ञानदान करत आहेत. यापूर्वी त्यांनी डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि एम. फार्मसीचे शिक्षण देखील स्वेरी मधूनच पूर्ण केले असून पीएच.डी. मिळविणाऱ्या डॉ. खुळे हया पहिल्या विद्यार्थिनी आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुनk मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ.खुळे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !