सिंहगडच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात वेबिनार संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी दिली.
इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनारचे उद्घाटन विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. सोनाली घोडके, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सिंहगड महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांना नामंकित तज्ञांकडून मार्गदर्शन व्हावे यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनार मध्ये "सस्टेनेबल पॉवर सिस्टीम" या विषयावर प्रा. अमित सोलंकी यांनी ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याशिवाय सोलार पाॅवर प्लँट चे कशापद्धतीने डिझाइन करावे, पवन उर्जा प्रकल्प कसा उभा करून त्याची कार्यप्रणाली कशी चालते या विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या वेबिनार मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेबिनारचे सुञसंचलन प्रा. नागनाथ खांडेकर यांनी केले तर आभार प्रा. सोनाली घोडके यांनी मानले.