*सिंहगड संस्थेच्या माध्यमातून आयटी कंपन्यात नोकरीच्या अनेक संधी- संदिप हेगडे*
पंढरपूर सिंहगड मध्ये "नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक गुण" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "कॅसपर्या" कंपनीकडून "नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक गुण " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान प्रमुख पाहुणे संदीप हेगडे व योगिनी कुलकर्णी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी केले.
यादरम्यान बोलताना संदीप हेगडे म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना नोकरी मिळविण्यासाठी अनेक कौशल्य आवश्यक आहे. भविष्यात आयटी कंपनी मध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत. या नोकरीच्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील शिक्षणाचा खुप मोठा लाभ आपणास होऊ शकतो. उद्योग क्षेत्रातही विद्यार्थी करिअर करू शकतात. सिंहगड महाविद्यालय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असून या मेहनतीचा फायदा सिंहगड मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यात नोकरी अनेक संधी मिळणार असल्याचे मत संदीप हेगडे यांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी मानसी नवले हिने केले.