१७ व्या युवा महोत्सवात स्वेरीची मोहोरचैताली शिंदे यांच्या भित्तीचित्रणाला मिळाला द्वितीय क्रमांक

0
                                                     दि.१६/१२/२०२१

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे ऑनलाईन आयोजिलेल्या 'उन्मेष सृजनरंगांचा' या १७ व्या युवा महोत्सवात ‘भित्तीचित्रण’ विभागात स्वेरी अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील चैताली विक्रम शिंदे यांच्या भित्तीचित्राला दुसरा क्रमांक मिळाला. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते पारितोषिक देऊन चैताली शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. 
           ‘उन्मेष सृजन रंगाचा’ अर्थात विविध कलाविष्काराचा ‘युवा महोत्सव’! या महोत्सवाच्या माध्यमांतून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी कलावंतांना व्यासपीठाद्वारे आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची आणि या प्रेरणेने आपले व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळत असते. यामुळे जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी या ‘युवा महोत्सवा’चे आतुरतेने वाट पहात असतात. यंदा आलेल्या जागतिक कोरोना महामारीमुळे हा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. त्यातील भित्तीचित्रण विभाग या स्पर्धेमध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कु. चैताली विक्रम शिंदे यांच्या भित्ती चित्राला दुसरा क्रमांक मिळाला. चैताली शिंदे यांनी 'सध्याची भेडसावणारी पाणी टंचाई' या दिलेल्या विषयावर लक्ष केंद्रित करून ‘पाणी वाचवा’ या विषयावर उदबोधक भित्तीचित्र सादर केले होते. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या प्रांगणात नुकताच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल (भापोसे) यांच्या हस्ते चैताली शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. चैताली शिंदे यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, विद्यार्थी अधिष्ठाता तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा. यशपाल खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच युवा महोत्सवाच्या समितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे आयोजन समितीचे सदस्य स्वेरी अभियांत्रिकीचे प्रा. यशपाल खेडकर यांना यावेळी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या या पुरस्कारामुळे स्वेरीचे नाव विद्यापीठाच्या या १७ व्या युवा महोत्सवामध्ये कोरले गेले. पुरस्कार वितरण करताना सोबत प्रभारी कुलसचिव डॉ. एस.के. पवार, प्र.कुलगुरू डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे व आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, स्वेरीचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी चैताली शिंदे यांचे युवा महोत्सवामध्ये मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !