स्वेरीच्या सात विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ कंपनीमध्ये निवडस्वेरीकडून कोरोना काळातही विद्यार्थ्यांना ५८० हून अधिक नोकऱ्यांची संधी

0

पंढरपूरः ‘इन्फोसिस’ या नामांकित कंपनीने केलेल्या निवड प्रक्रियेत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांना कोरोना कालावधी असताना देखील ५८० हून अधिक नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
         आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘इन्फोसिस’ या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून ऋतुजा नारायण निर्मळे, अमृता धनाजी श्रीरामे, श्रुती बबन कवडे, अबोली विजय गायकवाड, मानसी संजय घोगले, प्रनील प्रकाश नागरस व दिनेश उत्तम चव्हाण या सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.६ लाख रु. इतके पॅकेज मिळाले आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपन्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून संबधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीत पहिल्यापासून वार्षिक परीक्षेच्या निकालाप्रमाणेच प्लेसमेंटवर देखील अधिक भर दिल्यामुळे स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकीच्या पाचही विभागातील विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पॅकेजवर आणि मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या ‘इन्फोसिस’ कंपनी मधील या सातही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !