विठ्ठल चरणी नारळ फोडून डॉ. बी. पी. रोंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान

Maharastra now 24
0

 विठ्ठल चरणी नारळ फोडून डॉ. बी. पी. रोंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान

पंढरपूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील नामदेव पायरी येथे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आणि पांडुरंगाचे आशीर्वाद घेत डॉ. रोंगे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी आणि विविध शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

“पदाचा बडेजाव न करता सदैव शिक्षकांचा सेवकरी म्हणून शिक्षकांच्या हक्कासाठी लढत राहीन,” अशी भूमिका डॉ. बी. पी. रोंगे यांनी यावेळी व्यक्त केली.

नामदेव पायरी येथे झालेल्या या कार्यक्रमास समर्थक, शिक्षक व हितचिंतक उपस्थित होते. विठ्ठल चरणी नारळ फोडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्याने त्यांच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली.

  • Newer

    विठ्ठल चरणी नारळ फोडून डॉ. बी. पी. रोंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)