पुण्यातून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या मार्गस्थ, असा असेल पुढील प्रवास

Ashadhi Wari Palkhi: पुण्यातून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या मार्गस्थ, असा असेल पुढील प्रवास

Ashadhi Wari Palkhi: दोन दिवसांच्या पुणेकरांच्या उत्साहपूर्ण पाहुणचार घेतल्यानंतर आज 22 जून 2025 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्या आहेत. या पवित्र सोहळ्याने पुणे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी माऊलींच्या पालखीला दर्शन घेतले.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील वेळापत्रक

22 जूनः पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास, मुक्काम
23 जूनः लोणी काळभोर ते यवत प्रवास, मुक्काम
24 जूनः यवत वरवंड चौफुला प्रवास, मुक्काम
25 जूनः वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास, मुक्काम
26 जूनः उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास, मुक्काम
27 जूनः बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम (काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण)
28 जूनः सणसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास, मुक्काम (बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण)
29 जूनः निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
30 जूनः इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास, मुक्काम
1 जुलैः सराटी ते अकलूज प्रवास, मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलैः अकलूज ते बोरगाव प्रवास, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
3 जुलैः बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास, मुक्काम
4 जुलैः पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलैः वाखरी ते पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
6 जुलैः एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 जलैः पंढरपरातन देहकडे परतीचा प्रवास

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढील वेळापत्रक

22 जूनः पुणे ते सासवड (दिवेघाट वारकरी खेळ)
23 जूनः सासवड मुक्काम
24 जूनः सासवड ते जेजुरी (भंडाऱ्याची उधळण)
25 जून: जेजुरी ते वाल्हे (जेजुरी खंडोबा दर्शन)
26 जून: वाल्हे ते लोणंद (माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
27 जूनः लोणंद ते तरडगाव
28 जूनः तरडगाव ते फलटण
29 जूनः फलटण ते बरड
30 जूनः बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
1 जुलैः नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
2 जुलैः माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
3 जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण व टप्पा येथे बंधू
भेट)
4 जुलैः भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलैः वाखरी ते पंढरपूर (पौर्णिमेपर्यंत मुक्काम, वाखरी येथे गोल रिंगण)
6 जुलैः देवशयनी आषाढी एकादशी
10 जुलैः पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास

Post a Comment

Previous Post Next Post