केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा पंढरपुरात शुभारंभ

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा पंढरपुरात शुभारंभ 
पंढरपुरात 4 हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी..

राज्याच्या 80 शहरातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात विसावली

सायकल दिंडीने वारकरी परंपरेप्रमाणे केली नगर प्रदक्षिणा

    पंढरपूर दि:-(२२) महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्रातील 80 शहरातून 4 हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन होते आहे. या निमित्ताने सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. ,

फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पहायला मिळाली. 
यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post