स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात ‘आयपीआर’ या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये आयपीआर अर्थात ‘इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईटस्’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पुणे येथील ‘ब्राईट स्टार इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्माकर केळकर हे विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्तविकात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईटस्’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करून सविस्तर माहिती दिली. डॉ. केळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘पेटंट कसे लिहावे, पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया कशी असते आणि पेटंटचे काय महत्व आहे ?’ हे सांगून पेटंट सादर करताना आवश्यक असणार्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली. या ऑनलाइन सत्रात विद्यार्थी व प्राध्यापक मिळून जवळपास २२० जणांनी सहभाग नोंदविला होता. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी वाव मिळणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची डॉ. केळकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही.जी. काळे यांनी केले तर प्रा. व्ही.ए.पाटील यांनी आभार मानले.