पवार साहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांना जागा दाखवणार: अभिजीत पाटील.
हे मत मला नसून पवार साहेबांच्या तुतारीला
(अभिजीत पाटलांनी घेतली प्रचारामध्ये आघाडी पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावांमध्ये झंजावात प्रचाराला सुरुवात)
प्रतिनिधी /-
ज्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ऐनवेळी ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या मागे जाणे पसंत केले. शरद पवार यांचा पक्ष आणि चिन्ह हिरावून घेण्यासाठी ज्यांनी सह्या केल्या त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. येत्या माढा विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी काल देगाव,बिटरगाव अजूनसोंड येथील सभेत बोलताना केले.
सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच अनेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती पाहायला मिळत आहेत. यातील सर्वात रंगतदार लढत म्हणून माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहिले जात आहे. या मतदारसंघात सलग सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनराव शिंदे यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील या एका शेतकरी पुत्राने थेट आव्हान देत जेरीस आणून सोडले आहे. तुतारी वाजवणारा माणूस या शरदचंद्र पवार गटाच्या चिन्हावर लढणाऱ्या अभिजीत पाटील यांचा सामना बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्यासोबत होणार आहे. काल अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ बिटरगाव,अजनसोंड व देगाव या गावात गावभेट दौरे आयोजित करण्यात आले होते. अभिजीत पाटील यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे तसेच तुतारी चिन्हाबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे अभिजीत पाटील यांच्या गाव भेट दौऱ्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना अभिजीत पाटील यांनी सत्ताधारी गटाचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना ते म्हणाले की माढा मतदारसंघात अनेक विषय जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत.गेल्या 30 वर्षात सत्ता असूनही यांना शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. सोबतच यांनी 30 वर्षात जेवढा विकास केला नाही तेवढा विकास मला निवडून दिल्यास मी केवळ पाच वर्षात करून दाखवतो असे आवाहनही लोकांना केले. सोबतच ज्यांना पवार साहेबांनी मोठे केलं, ज्यांना गेले तीस वर्षात सत्तेत भागीदारी दिली, त्याच लोकांनी साहेबांची ऐनवेळी साथ सोडत विरोधात जाणे पसंत केले होते. मात्र आता निवडून येणे शक्य नसल्याचे त्यांना दिसू लागल्यानेच त्यांनी तुतारी मिळावी यासाठी पवार साहेबांची उंबरे झिजवले मात्र गेल्या 30 वर्षात कसलाच विकास न केल्यामुळे त्यांना तिथूनही रिकाम्या हाताने परत यावे लागले इथेच त्यांचा पराभव झाला असा घणाघात त्यांनी आ.शिंदे यांच्यावर केला. पवार साहेबांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला उमेदवारी देऊन आशिर्वाद दिला आहे.
अनेक वकत्यांनी बोलतांना सांगितले की दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अभिजित पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे.माढा मतदारसंघातील जनता अभिजीत पाटील म्हणजे अशेच किरण म्हणून पाहत आहेत.यावेळी अनेक प्रमुख मान्यवर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अशा मध्येच 42 गावांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले.