स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाखांचे पॅकेज

0

 


स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाखांचे पॅकेज


पंढरपूरः ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील निकिता पोरे, नुपूर पवार व प्रज्ञा रेपाळ या तीन विद्यार्थिनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.


    ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील निकिता ज्ञानेश्वर पोरे, नुपूर निलेश पवार व प्रज्ञा अनिल रेपाळ या तीन विद्यार्थिनींची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ ही कंपनी ३४ वर्षे जुनी असून १९९० साली स्थापन झाली आहे. या कंपनीमध्ये २३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपनी प्रामुख्याने क्लाऊड, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या क्षेत्रात कार्यरत आहे. आनंद देशपांडे हे या कंपनीचे संस्थापक आहेत. अशा नामवंत कंपनीत स्वेरीचे विद्यार्थी रुजू होतात, हे देखील विशेष महत्वाचे आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या कंपनीत निवड झालेल्या निकिता पोरे, नुपूर पवार व प्रज्ञा रेपाळ यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !