मनसेच्या दोन्ही उमेदवारांनी मुंबईत विविध महापुरुषांना विनम्र अभिवादन करून दर्शन घेतले.
प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केले आहे.
आज या दोन्ही उमेदवारांनी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले.
त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी चैत्यभूमी येथे विश्वरत्न परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
त्याचबरोबर थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी सहकारी उपस्थित होते.