विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा - अमर पाटील.

0
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा - अमर पाटील.
एकीकडे कारखान्याचे प्रश्न मार्गी लावत दुसरीकडे जनसंपर्क वाढवण्याच्या जोरावर अभिजीत पाटलाची विधानसभेची साखर पेरणी सुरू

मेंढापूर येथील खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून पैठणीच्या माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद

पंढरपूर / प्रतिनिधी : 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या वतीने माता-भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन क्षण स्वतःसाठी जगता यावे, या हेतूने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर या ठिकाणी करण्यात आले होते. त्याला स्थानिक माता-भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..

एकीकडे अभिजीत पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाचा प्रश्न मार्गी लावत असताना दुसरीकडेच माढा मतदारसंघांमध्ये विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्र असणाऱ्या 42 गावांमध्ये मोठा जनसंपर्क वाढवण्याच्या वर विधानसभेची साखर पेरणी सुरू आहे.

रक्षाबंधन व नागपंचमीच्या निमित्ताने विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी खेळ पैठणीचे मनोरंजन कार्यक्रम घेऊन घेत असताना पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या सर्व माता-भगिनींच्या कुटुंबातील एक सदस्य, भाऊ आणि एक मुलगा म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे माझी जबाबदारी आहे. येत्या काळात त्यांच्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा माय माऊलींच्या आशीर्वादातून नक्कीच मिळेल असे धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, नवनाथ नाईकनवरे, सिद्धेश्वर बंडगर यांसह मेंढापूर येथील शरद पाटील, विपुल मखर, बाबासाहेब पवार, अमर पवार, तात्या पाटील, राहुल कदम, विशाल पवार, प्रवीण पवार, विकास मखर, आबासाहेब गवळी, संघर्ष पवार, युवराज गोरे, स्वप्नील पवार, शंकर थिटे, अमर पाटील, कुलदीप पाटोळे, ऋषिकेश नागणे, समाधान पवार, अविनाश गोरे, आबा सरवळे, सागर पवार, अतुल पवार, सुहास पवार, बालाजी पाटील, सारंग पाटील, एकनाथ कोरके, संभाजी चव्हाण तसेच समस्त ग्रामस्थ मेंढापूर येथील महेश पाटील, रायबा मस्के, गणेश शिंदे, हर्षद मोहिते, विशाल झेंडे, सागर झेंडे, किशोर मखर, शांताराम शेळके, रामभाऊ पाटोळे, सुजित पाटोळे, प्रवीण पाटील, ऋषिकेश मकर यासह अनेक ग्रामस्थसह महिला भगिंनी, नागरिक उपस्थित होते..
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !