स्वेरीच्या मुस्तकीम बारसकर यांची ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ४.८ लाखांचे पॅकेज

0
स्वेरीच्या मुस्तकीम बारसकर यांची ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ४.८ लाखांचे पॅकेज
पंढरपूरः‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील मुस्तकीम महमदहनीफ बारसकर यांची कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
     पुणे येथील ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या  मुस्तकीम महमदहनीफ बारसकर या विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४.८  लाख इतके पॅकेज मिळाले आहे. अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांना या कंपनीत इंटर्नशीपची संधी देखील मिळाली होती. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्सड टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार,  स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या मुस्तकीम बारसकर यांचे अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !