डी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये सदर रजिस्ट्रेशनची मोफत सोय
पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर म्हणुन स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०८ ऑगस्ट २०२४) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये डी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५) म्हणून स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. यंदाचे हे डी. फार्मसीचे १६ वे वर्ष असून महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेशाकरिता बारावी सायन्स परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया दि. ०८ ऑगस्ट २०२४ पासून ते दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ बारावी सायन्स मधून उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. स्वेरी फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे आणखी एका डी. फार्मसी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. डी. फार्मसीच्या प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र. ९९२१७६२७२८ व ९५१८९८४१८२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फार्मसीच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.